Notifications

2. प्रेस नोट

महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळामार्फत महाराष्ट्रातील विविध निसर्ग पर्यटन स्थळाच्या विकासाची कामे क्षेत्रिय अधिकाऱ्यांमार्फत केल्या जातात.  महाराष्ट्रातील एकूण 320  निसर्ग पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून या सर्व पर्यटन स्थळांचे विकास आराखडे क्षेत्रिय स्तरावर बनवुन त्याची मंजुरी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या कार्यकारी समितीकडुन घेतल्या जाते.   दिनांक 20/02/2018 रोजी मंडळाच्या 5 व्या सभेमध्ये एकूण 29 आराखड्यांचे सादरीकरण मडळाच्या कार्यकारी समितीसमोर करण्यात आले.  ह्या आराखड्यांना कार्यकारी समितीद्वारा काही दुरूस्ती व सूचनांच्या अधिन राहुन मंजुरी प्रदान केली आहे.     कार्यकारी समितीचे अध्यक्ष मा. श्री. श्रीभगवान, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) , महाराष्ट्र राज्य, नागपूर तसेच समितीचे इतर शासकीय व अशासकीय सभासद उपस्थित होते.  यवतमाळ येथील “वडाली बांबु उद्यानाचे” धर्तीवर बांबु उद्याने, बांबु प्रशिक्षण केंद्र व रोपवाटिका निर्मिती करण्याचे प्रस्तावाला कार्यकारी समितीने मान्यता दिली.  चिखलदरा येथील वनक्षेत्रातील महत्वाच्या पर्यटन स्थळांच्या प्रस्तावांचे सादरीकरण उपवनसंरक्षक, पूर्व मेळघाट  यांनी केले.    वडाला अमरावती येथे 100 हेक्टर क्षेत्रावर बांबु उद्यान निर्मिती  ई.  अशा प्रकल्पांना समितीने मंजुरी दिली. 

            पुणे – नाशिक महामार्गावर जुन्नर विभागातील राजगड, तोरणागड व यायरेगड वनक्षेत्रातील 3 किल्ल्यांच्या विकास कामांचे नियोजन करण्यात आले असुन त्याबाबतच्या विकास आराखड्यांना समितीने मंजुरी दिली.   जुन्नर विभागातील कुंडेश्वर, शंभुमहादेव टेकडी या स्थळांच्या पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्यांना समितीद्वारा मान्यता देण्यात आली.   तसेच पंढरपूर येथे तुळशी वृंदावन या प्रकल्पाची  निर्मिती  वन विभागामार्फत करण्यात येत असुन त्यास कार्यकारी समितीची मान्यता प्राप्त झाली.  हा प्रकल्प मे, 2018 मध्ये पूर्ण होणार आहे.   नवेगांव-नागझिरा  वन्यजीव प्रकल्प येथे विकास कामांचे  नियोजन करण्यात आले असुन त्याला सुद्धा समितीची मान्यता प्राप्त झाली आहे.  असे संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण 29 निसर्ग पर्यटन स्थळांच्या प्रकल्पांना कार्यकारी समितीची मान्यता प्राप्त झाली आहे.  या कामांकरिता  राज्य पर्यटन योजनेतून  चालू वर्षात व पुढील वर्षात क्षेत्रिय अधिकाऱ्यांना या मंडळामार्फत निधी उपलब्ध करून  दिला जाईल.

            सदर सभेत मा. श्री. श्रीभगवान, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) , महाराष्ट्र राज्य;  श्री. महीप गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक,  महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ;  श्री. एन. रामबाबु, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व,  श्री. नितीन काकोडकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य;  श्री. विकास गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा), महाराष्ट्र राज्य;  श्री. सुनिल  लिमये,  अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक), महाराष्ट्र राज्य;  श्री. श्रीनिवास माडभुषी,  विभागीय वन अधिकारी, म.नि.प.वि.मं.;  श्री.किशोर मिश्रीकोटकर, विभागीय वन अधिकारी; म.नि.प.वि.मं.  तसेच विविध वनवृत्तांचे  प्रतिनिधी उपस्थित होते.

            श्री. संजय करकरे;  श्री. निशी मुखर्जी;  श्री. दिलीप आर. चिंचमलातपूरे; व श्री. हनुमंत हेडे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे कार्यकारी समिती सदस्य सभेस उपस्थित होते.

******

Copyright © 2016 MEDB 2016 All Rights Reserved